सहसंपादक अनिल बोराडे
धुळे, १९ जून: शिवसेना वर्धापन दिनाच्या औचित्यावर, आज जिल्ह्यातील लाटीपाडा येथील जिल्हा परिषद शाळा तसेच पिंपळनेर येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा क्रमांक एक येथे गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. शिवसेनेच्या या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर एकखंडे, व्यापारी आघाडी प्रमुख श्री. श्यामशेठ कोठावदे, आणि विधानसभा प्रमुख श्री. संभाजी अहिरराव हे प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्तेच विद्यार्थ्यांना या वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य उज्वल होण्यास मदत होईल, अशी आशा उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना श्री. ज्ञानेश्वर एकखंडे यांनी सांगितले की, शिवसेना केवळ राजकीय पक्ष नसून, समाजसेवेलाही प्राधान्य देते. शिक्षण हेच विकासाचे मूळ आहे, हे ओळखून आम्ही विद्यार्थ्यांसाठी हा छोटासा प्रयत्न करत आहोत. भविष्यातही असेच सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला लाटीपाडा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. तोरवणे सर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक तोरवणे सरांनी या मदतकार्याबद्दल शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांसाठी वह्यांची ही भेट अत्यंत मोलाची आहे आणि यामुळे अनेक पालकांवरील आर्थिक बोजा कमी होईल.
शिवसेनेने राबवलेला हा उपक्रम समाजासाठी एक आदर्श उदाहरण असून, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दलची आवड अधिक वाढण्यास मदत होईल.
Post a Comment
0 Comments