नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी
हिंदी व विज्ञान विषयात पास झालेल्या काँग्रेसला उर्वरित चार विषयांमध्ये अपयश
- दहावीच्या निकालात काँग्रेस नापास झाला आहे,
- तब्बल चार विषयात नापास झाल्याने काँग्रेसच्या पदरी निराशा पडली आहे. हिंदी आणि विज्ञान विषयात उत्तीर्ण झालेल्या काँग्रेसला मात्र उर्वरित चार विषयांमध्ये अपयश आले आहे.
एकीकडे काँग्रेसला अनेक निवडणुकांमध्ये अपयश आले असताना आता काँग्रेस दहावीत देखील नापास झाल्याची माहिती समोर आली आहे. आता तुम्ही म्हणाल काँग्रेस दहावीत नापास कशी होऊ शकते.. मात्र हे खर आहे काँग्रेस दहावीत नापास झाला आहे. ही गोष्ट नंदुरबार जिल्ह्यातील असून पूर्णपणे खरी आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील एका आश्रम शाळेत शिकणाऱ्या काँग्रेस नामक विद्यार्थ्यांची ही गोष्ट आहे.
शहादा तालुक्यातील नवागाव येथील कै. ए. एम. सोनवणे अनुदानित आश्रम शाळेचा निकाल 94 टक्के इतका लागला. या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी गुणांची लयलूट करत घवघवीत यश मिळवले. रोशनी वसावे ही विद्यार्थिनी 89 टक्के गुण मिळवत विद्यालयात पहिली आली आहे. अनिल पाडवी याने 87 टक्क्यांसह द्वितीय तर नितीन वळवी याने 85 टक्के मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. काँग्रेसला मात्र दहावीच्या परीक्षेत अपयश आले आहे.
कै. ए. एम. सोनवणे अनुदानित आश्रम शाळेचा विद्यार्थी काँग्रेस लाडका वास्कले हा चार विषयात अनुत्तीर्ण झाला आहे. काँग्रेस पक्षाच्या नावाशी संबंधित असलेल्या 'काँग्रेस' या त्याच्या नावामुळे मात्र चर्चांना उधाण आले आहे. दहावीत नापास झालेला हा विद्यार्थी त्याच्या काँग्रेस या अनोख्या नावामुळे चर्चेत आला आहे. काँग्रेसला या परीक्षेत अपयश आले असले तरी त्याला पुन्हा परीक्षा देऊन दहावी उत्तीर्ण होण्याची संधी आहे. पुढील परीक्षेसाठी काँग्रेसला शुभेच्छा, काँग्रेस पुढच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी पास होईल ही अपेक्षा...
Post a Comment
0 Comments