सहसंपादक अनिल बोराडे
नंदुरबार शहर पोदार प्रेप मध्ये घर आणि शाळा पूल बांधणे हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश घर आणि शाळा यातील साम्य योग्य ते समायोजन निर्माण करणे. आम्ही समजू शकतो आपल्या मुलाचा आनंददायी शिक्षणाचा सहभाग. लहान मुलाच्या यशासाठी अत्यंत प्रभावशाली आहे. त्यासाठी शाळा व पालक यांचे एकत्रीकरण,सुसंवाद,यासाठी एक व्यासपीठ प्रदान केले जाते. ही एक अत्यंत महत्त्वाची भूमिका म्हणून आम्ही काम करत असतो. मुलांची कौशल्य, त्यात दडलेले सात्विक गुण ओळखणे, त्याबद्दलचा दृष्टिकोन, आनंददायी अभ्यासक्रम, मुक्त शैक्षणिक प्रवास . यात सुसंवाद साधून सहभाग वाढवणे हे या कार्यक्रमाचे एकमेव उद्दिष्ट
या कार्यक्रमातून साध्य केले जाते. प्रथमता सर्वांचे स्वागत करून. कार्यक्रमाचा हेतू व उद्दिष्ट सांगून .थोडक्यात अजेंडा बद्दल स्पष्टीकरण करून. कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे प्राचार्य अजय फरांदे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पोदार प्रेप च्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा गोसावी यांचेही मार्गदर्शन लाभले.
त्याचबरोबर
शाळेतील शिक्षिका व इतर कर्मचारी या सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न केला.
Post a Comment
0 Comments