सहसंपादक अनिल बोराडे
धुळे: भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात ड्रोन उडवण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यात परवानगीशिवाय आणि बेकायदेशीरपणे ड्रोन उडवण्यास मनाई करण्यात आली आहे.
भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ (१) (अ) नुसार, धुळे जिल्ह्यात १६ मे २०२५ रोजी ००:०१ वाजेपासून ते २४ मे २०२५ रोजी रात्री २४:०० वाजेपर्यंत ड्रोन उडवण्यासाठी 'नो फ्लाय झोन' घोषित करण्यात आला आहे.
या आदेशानुसार, कोणत्याही व्यक्तीस परवानगीशिवाय आणि बेकायदेशीरपणे ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करून चित्रीकरण करता येणार नाही. तसेच, ड्रोनद्वारे कोणतीही वस्तू फेकण्यास किंवा उतरवण्यास मनाई आहे. जर कोणाला अत्यावश्यक कारणास्तव ड्रोन उडवायचे असल्यास, त्यांना पोलीस विभागाकडून पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असेल.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, याची नोंद घ्यावी. तसेच, ड्रोन चालवणारे मालक कोणत्याही उल्लंघनासाठी स्वतः जबाबदार राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सदर आदेश धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाने जारी केला आहे. या आदेशाची प्रत माहितीसाठी सर्व पोलीस ठाणी आणि संबंधित शासकीय कार्यालयांना पाठवण्यात आली आहे.
Post a Comment
0 Comments