Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नवापूर शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील देवळाफळी उड्डाणपुलावर भीषण अपघात; तीगाना तात्काळ रुग्णालयात हलवले

 नवापूर (प्रतिनिधी): नवापूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील देवळाफळी उड्डाणपुलावर आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. पिकअप वाहन क्रमांक एम एच 20 इ जी 4252 आणि ट्राला क्रमांक सी जी 07 ए ए 3486 या दोन वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, परिसरात एकच खळबळ उडाली.


मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी घडलेल्या या अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक आणि मार्गस्थ प्रवासी तात्काळ घटनास्थळी जमा झाले. अपघाताची भीषणता पाहून अनेकांना धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच, जे एम म्हात्रे कंपनीचे सेफ्टी इंजिनियर जितेंद्र पाटील आणि जेसीबी ऑपरेटर सूरज गावित यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली.


मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी जखमींना मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत अपघातात जखमी हमद रफीक शेख वय ३४,रऊफ शेख,रुखमन शेख सर्व रा सिलोड या व्यक्तींना नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या या तत्परतेमुळे जखमींना वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाला होता, मात्र त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे.

Post a Comment

0 Comments