सहसंपादक अनिल बोराडे
(नंदुरबार): नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या(सी बी एस सी बोर्ड) परीक्षेत पोदार इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे. शाळेतील सोनाक्षी श्रीवास्तव या विद्यार्थिनीने ९७.४०% गुण मिळवून जिल्ह्यात व शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच राज खरे ९६.२०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक, हेमंत पटेल ९५.६०% गुण मिळवून तृतीय क्रमांक, वीरप्रताप सिंग ९४.८०% गुण मिळवून चतुर्थ क्रमांक आणि लावण्या पाटील ९३.६०% गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकाविला आहे.
तसेच शाळेतील ११ विद्यार्थी हे ९०% पेक्षा अधिक गुण श्रेणीत, २२ विद्यार्थी हे ८० ते ९० च्या श्रेणीत, १५ विद्यार्थी हे ७० ते ८० च्या श्रेणीत, ११ विद्यार्थी हे ६० ते ७० च्या श्रेणीत, २० विद्यार्थी हे ५० ते ६० च्या श्रेणीत आले आहेत.
वरील सर्व विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळवले, असे मत पोदार इंटरनॅशनल शाळेचे प्राचार्य आदरणीय अजय फरांदे सर यांनी व्यक्त केले. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर शाळेचे प्रशासकीय अधिकारी सचिन हळवे सर हेड मिस्ट्रेस प्रतिक्षा गोसावी मॅडम शाळा समन्वयक संदीप कुटे सर, अल्ताफ फकीर, कमलाकर गांगुर्डे, भाग्यवती साळवे आणि कार्यक्रम समन्वयक शीतल समर्थ मॅडम यांनी व शाळेच्या शिक्षकवृंदांनीही विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. "विद्यार्थ्यांची मेहनत आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांमुळेच हे उत्तम यश प्राप्त झाले आहे," असे मत सर्व पालकांनी व्यक्त केले.
Post a Comment
0 Comments