सहसंपादक अनिल बोराडे
पिंपळनेर (ता. साक्री, जि. धुळे): धुळे जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीत (सन 2025 ते 2030) शिरसोला येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे औषध निर्माण अधिकारी श्री. रविंद्र भाऊराव आजगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल पिंपळनेर येथे एका सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. धरतीताई निखिलजी देवरे यांनी श्री. आजगे यांचा सपत्नीक यथोचित सत्कार केला. यावेळी शिक्षण सभापती मा. मंगलाताई भामरे, महिला व बालकल्याण सभापती मा. सौ. संजिवनीताई सिसोदिया, महिला व बालकल्याण सभापती मा. सौ. ज्योतीताई बोरसे, तसेच जिल्हा परिषद सदस्या मा. सौ. अभिलाषाताई पाटील, जिल्हा परिषद सदस्य मा. सकुताई पारधी आणि जिल्हा परिषद सदस्य मा. वैशालीताई चौधरी यांनीही उपस्थित राहून श्री. आजगे यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी भाजपच्या धुळे जिल्ह्याच्या ग्रामीण चिटणीस मा. सौ. सुवर्णाताई आजगे, कलाताई आजगे, सौ. अरूणा बिरारीस, डॉ. लिना आजगे, मयुरी आजगे, भिलाजी जिरे, शिरिष बिरारीस, प्रशांत साळुंखे, गिरीश वाघ, निल आजगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री. रविंद्र भाऊराव आजगे यांच्या बिनविरोध निवडीमुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अध्यक्षा सौ. धरतीताई देवरे यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post a Comment
0 Comments