सहसंपादक अनिल बोराडे
धुळे, दि. 9: धुळे शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत सुरत बायपास रोडवरील पाण्याच्या टाकीजवळून 2.5 लाख रुपये किंमतीचा 10 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गणेश सुरेशसिंग परदेशी (रा. बुंदेलपुरा, नांदगाव रोड, येवला जि. नासिक) याला अटक केली आहे. त्याने हा गांजा सुनील पावरा (रा. पिरपाणी ता. शिरपूर जि. धुळे) याच्याकडून खरेदी केल्याची कबुली दिली असून, पोलिसांनी सुनील पावरलाही ताब्यात घेतले आहे.
धुळे शहर पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलिसांनी सुरत बायपास रोडवर सापळा रचला होता. दुपारी दोन वाजेच्या सुमारास गणेश परदेशी गांजा विक्रीसाठी आला असता, पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून 10 किलो गांजा जप्त करण्यात आला, ज्याची किंमत 2.5 लाख रुपये आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश परदेशीने हा गांजा विष्णु बडोदे (पंडोरे) (रा. तारगल्ली येवला जि. नासिक) याला देण्यासाठी आणला होता. पोलिसांनी आता गणेश परदेशी आणि त्याला गांजा पुरवणारा सुनील पावरा या दोघांनाही अटक केली आहे.
या कारवाईत पोलीस अंमलदार कुंदन पटाईत, राहुल सोनवणे, गौरव देवरे, महेश मोरे, राकेश मोरे, धम्मपाल वाघ, तुषार पारधी, प्रशांत नाथजोगी, योगेश ठाकुर, अमित रणमाळे, अमोल पगारे यांच्या पथकाने सहभाग घेतला. पुढील तपास महिला सपोनि/वर्षा पाटील करत आहेत. या मोठ्या कारवाईमुळे धुळे शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Post a Comment
0 Comments