Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

नवापूर तहसील कार्यालयात अभ्यागत कक्ष व QR कोड वाचनालयाचे उद्घाटन

 मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या १०० दिवसांच्या विशेष कार्यक्रमांतर्गत, आज नवापूर तहसील कार्यालयात अभ्यागत कक्ष व त्याअंतर्गत QR कोड वाचनालयाचे उद्घाटन मा. आमदार शिरीष नाईक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.



ग्रामीण भागातून तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी अभ्यागत कक्षामध्ये आरामदायक बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये QR कोड वाचनालयाद्वारे विविध शासकीय योजनांची माहिती सहज उपलब्ध होणार असून, डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे योजनांबाबत मार्गदर्शन दिले जाईल.


तसेच जमीन व्यवहाराशी संबंधित कायदे व नियम कथारूप माहिती फलकांद्वारे समजावून सांगण्यात आले आहेत, जेणेकरून नागरिकांना अधिक स्पष्टता मिळेल. याशिवाय, तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.


हा उपक्रम ग्रामीण भागातील नागरिकांना माहिती-संपन्न बनवण्यासाठी आणि त्यांच्या सुविधा वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष गिरीश गावित माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे माजी नगरसेवक अजय पाटील सामाजिक कार्यकर्ते मंगेश येवले आणि नागरीक व तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments