सहसंपादक अनिल बोराडे
धुळे: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या एका यशस्वी कारवाईत शिरपूर तालुक्यातील चिंचपाटी गावाच्या शिवारात तब्बल ४२ लाख ३५ हजार रुपये किमतीचा ६०५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
पोलिस अधीक्षक श्री. श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्यांवर लक्ष ठेवून असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की चिंचपाटी शिवारात गांजाची मोठी खेप येणार आहे. त्यानुसार, पोलिस निरीक्षक श्री. श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरपूर तालुका पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे सापळा रचला.
![]() |
जप्त केलेला गांजा |
या कारवाईत पोलिसांनी हिरवट पाला, बिया आणि मिश्रित स्वरूपातील एकूण ६०५ किलो गांजा जप्त केला, ज्याची अंदाजित किंमत ४२ लाख ३५ हजार रुपये आहे. यासोबतच पोलिसांनी घटनास्थळावरून १०,०४० रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरलेली दोन वाहने देखील जप्त केली आहेत.
या प्रकरणी, पोलिसांनी रविंद्र गणेश पाडवी (रा. चिंचपाटी, ता. शिरपूर, जि. धुळे) आणि एका अज्ञात आरोपीविरुद्ध शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुंगीकारक औषधे आणि मन:प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
या कामगिरीत पोलिस निरीक्षक श्री. श्रीराम पवार, पोउपनि. अमित माळी, सपोउपनि. स्था.गु.शा. धुळे, पोउपनि. जयपाल हिरे, पोहेकॉ. सुनिल वसवे, पोहेकॉ. आरिफ पठाण, पोहेकॉ. पवन गवळी, पोहेकॉ. पंकज खैरमोडे, पोकॉ. मयूर पाटील, पोकॉ. योगेश जगताप, पोकॉ. जगदीश सुर्यवंशी, पोकॉ. कमलेश सुर्यवंशी, पोकॉ. राहुल गिरी (चालक), पोकॉ. भिल, पोकॉ. गुलाब पाटील (सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, धुळे) तसेच पोहेकॉ. राजू हिवराळे, पोकॉ. प्रकाश भिल, पोकॉ. ग्यानसिंग पावरा, पोकॉ. रोहिदास पावरा (सर्व नेमणूक शिरपूर तालुका पोलिस स्टेशन) यांनी सहभाग घेतला. पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करत आहेत.
Post a Comment
0 Comments