सहसंपादक अनिल बोराडे
८ मार्च जागतिक महिलादि नाच्या निमिताने राजे छत्रपती मार्शल आर्ट्स इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल येथे सर्व सावित्रीच्या लेकींना व सर्व ज्ञानयात्री शिक्षिकांचा मानाचे फेटे बांधून, शाल श्रीफळ व बुके देऊन सन्मान करण्यात आला.
उज्वल वाटचालीसाठी संस्थेचे चेअरमन संभाजीराव अहिरराव यांनी सर्व महिलाना शुभेच्छा दिल्या.रामायण महाभारत काळापासून तर आधुनिक काळापर्यंत स्त्रियांनी जीवनाचे प्रत्येक क्षेत्रात अलौकिक कार्य केले व यश संपादन केले आहे. त्यांनी प्रतिकूलतेतून अनुकूल घडवून यशाचे एवरेस्ट गाठले आहे, भविष्यातही त्यांनी उज्वल यश संपादन करावे अशा शुभेच्छा दिल्या व मौल्यवान मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या
सोनाली पाटील यांनी सांगितले आम्ही सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबर संस्कार संस्कृती बंधुता ची परंपरा राजे छत्रपती इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये देण्याचा प्रयत्न करीत असतो असे प्रतिपादन केले त्याचबरोबर
सर्व महिला शिक्षिका व महिला शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल अहिरे यांनी केले. तर प्राचार्या
सोनाली पाटील व सर्व महिला
कर्मचारी वृंदाने संस्थेचे चेअरमन संभाजीराव अहिरराव व संचालक मंडळाचे व
सर्व शिक्षक बंधूंचे आभार मानले.
Post a Comment
0 Comments