Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग पिंपळनेर यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन

सहसंपादक अनिल बोराडे 


हिंस्त्र प्राण्यांचा बंदोबस्त करावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने वनपरीक्षेत्र अधिकारी श्री. ओंकार. एस. ढोले, श्री.एस. पी. मंडलिक वनपाल पिंपळनेर यांना निवेदन दिले.पिंपळनेर परिसरात चिकसे, देशिरवाडे, शेलबारी, डांगशीरवाडे, देगाव, सामोडे, जेबापूर, पानखेडा, पांगनदर, नवापाडा, परिसरात बिबट्याने खूप थैमान घातले आहे व पाळीव प्राणी व माणसांवर जीवितहानी वारंवार हल्ला करीत आहे, तसेच परिसरातील शेतकरी बांधवांनी वन विभागास निवेदन देऊनही पाहिजे तशी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. तरी महोदयांनी कारवाई करत म्हणजेच पिंजऱ्याचा बंदोबस्त करून बिबट्याला जेल बंद करावे. शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. शिवारात वीज असूनही, हिंस्त्र प्राण्यांच्या  दहशतीमुळे शेतकरी जीव मुठीत धरून काम करत आहेत. काही उपाययोजना न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. यावेळी निवेदन देतांना शिवसेना धुळे जिल्हा समन्वयक किशोर आप्पा वाघ, पिंपळनेर तालुकाप्रमुख तुषार गवळी, शिवसेना पिंपळनेर शहरप्रमुख महेश (टिनू) वाघ, शहर संघटक अतुल चौधरी, उपशहर प्रमुख बाबा शेख, विभागप्रमुख खुशाल वाडेकर, युवासेना शहराधिकारी मयूर नांद्रे, पुरुषोत्तम महाजन, राजेंद्र सोनवणे, भूषण कोठावदे, युवराज अहिरे, सुभाष पवार, स्वप्निल कोठावदे, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments